मायबाप रसिकहो

सप्रेम नमस्कार!
माझ्या या वेबसाईटवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत !


Video Gallery
Pics Gallery
Latest Updates

गेली तीस वर्ष आपण माझ्या " कुटुंब ......." चे रसिक सदस्य आहात. आता आपल्यासाठी आणखी नवे कार्यक्रम मी घेऊन आलोय .

कुटुंब रंगलंय काव्यात - एकपात्री नाट्यानुभव
ओंकार काव्यदर्शन - शालेय कार्यक्रम
छंदात रंगली कविता - कार्यक्रम
असे काव्य जन्मा येते - व्याख्यान
बहिणाबाईची कविता - व्याख्यान
'ग. दि. मां.' ची कविता - व्याख्यान

आगामी हिंदी -  कुनबा जोडे कविताई
आणखी एक नवा कार्यक्रम म्हणजे ,
 मराठी कवयित्रींच्या काव्याचा प्रवास -'सई बोल ना काही'!
संकल्पना, निर्मिती, दिग्दर्शन - प्रा.विसुभाऊ बापट 

सोबत " कुटुंब ......." जसा आहे तसा, कुटुंब (ज्येष्ठ नागरिक स्पेशल) , कुटुंब (महिला स्पेशल), कुटुंब (युवा स्पेशल),
कुटुंब (पुरुष स्पेशल) आहेच !,
विसरलोच! ...... ' शर्यत रे अपुली ' सीरिअल पाहिलीत ना? आता त्यातील काही निवडक कवींना घेऊन तीन तासांचा लाईव्ह शो देखील करतोय बरं का !
आणि हे सर्व साकार होऊ शकलं ते तुम्ही दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यामुळे. यापुढेही तुमची साथ मला अशीच मिळत राहील ही अपेक्षा करतो .
"तुम्ही उदार आश्रय दिला म्हणून ही कला तुम्हाला दिसली , जोवरी तुमची कृपा तोवरी वाण आम्हाला कसली"
धन्यवाद!

आपला ,
विसुभाऊ बापट.